वेंगुर्ला आगारात ‘ही’ बससेवा नियमित ठेवण्याची मागणी. ; जि. प. सदस्या सुजाता पडवळ यांच्या नेतृत्वात निवेदन सादर.

वेंगुर्ला : सावंतवाडी येथून सायंकाळी ४.२० वाजता सुटणारी सावंतवाडी–काजरमळी मार्गे वेंगुर्ला बस सेवा दररोज सुरळीत सुरू ठेवावी, या मागणीसाठी आज वेंगुर्ला आगारात निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदन तुळस जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ यांच्या वतीने देण्यात आले.

सावंतवाडी–काजरमळी मार्गे वेंगुर्ला ही बस सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत चालवली जाते. या बसमुळे सावंतवाडी, काजरमळी परिसर आणि वेंगुर्ला येथील नागरिकांना दळणवळणासाठी मोठा आधार मिळतो. विशेषतः महिला, विद्यार्थी, कामगार व ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बस सेवा नियमितपणे सुरू ठेवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

या वेळी समिता भगत, प्राची गोळम, वैष्णवी सावंत, गायत्री पांगम, साक्षी पांगम, नितीन कोचरेकर, गुंडू परब, आत्माराम आरमारकार तसेच काजरमळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles