चेंदवण येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

  • संजय पिळणकर. 
  • कुडाळ : कै. आनंद सखाराम शृंगारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरु करण्यात आलेल्या रुग्णसेवेचे दुसरे पुष्प म्हणून श्री माऊलीच्या उत्सवा निमित्त श्रीमती अंजनी आनंद शृंगारे यांच्या वतीने तसेच चेंदवण देवस्थान समिती व ग्रामपंचायत चेंदवणच्या सहकार्याने परिसरातील ग्रामस्थ व आरोग्य सुविधांची गरज असलेल्या नागरिकांसाठी चेंदवण येथे नुकतेच  मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास एसएसपीएम मेडिकल व लाईफ टाईम हॉस्पिटल, पेडवे – सिंधुदुर्ग या रुग्णालयाचे विशेष सहकार्य लाभले.

शिबिराचे उदघाटन श्री माऊली देवस्थान अध्यक्ष संजय परब, ग्रामपंचायत सरपंच वैभव विनोद चेंदवणकर,
रामचंद्र परब सचिव, विजय मेस्त्री खजिनदार, नारायण शृंगारे, सूर्यकांत शृंगारे, प्रदीप शृंगारे, सुरेश साळकर, सिद्धेश साळकर (पोलीस पाटील नांदरुख) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सदर कार्यक्रमास कुडाळ तालुक्याचे तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार श्री. जाधव साहेब, मंडल अधिकारी श्री. गवस आदि उपस्थित होते. तसेच तलाठी चेंदवण नेरकर भाऊ, तलाठी मयेकर मॅडम,कोतवाल चेंदवण जाधव,नाईकनगर पोलीस पाटील सौ.शृंगारे,वैभव बखले, सुभाष चेंदवनकर,निलेश गुरव,रक्त मित्र भूपेश चेंदवणकर,देवेंद्र नाईक माजी सरपंच चेंदवण,दिनेश चव्हाण माजी सरपंच नांदरुख यांनी भेट देऊन या स्तुत्य उपक्रमास प्रोत्साहन दिले.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत चाललेल्या या शिबिरामध्ये सर्व रुग्णांची नोंदणी करून सर्वसाधारण आरोग्य तपासणी (रक्तदाब मधुमेह BMI)  जनरल आरोग्य तपासणी व ECG केले. त्यासोबत शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयरोग तपासणी, मूत्रविज्ञान तपासणी, सामान्य शस्त्रक्रिया आणि पुढील मार्गदर्शन, कर्करोग तपासणी आणि त्या संबंधी जागरूकता, डोळे तपासणी, अस्थीरोग तपासणी, स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूती शास्त्राची तपासणी त्याचबरोबर गरजे प्रमाणे
मोफत जेनेरिक मेडिसिन देण्यात आली.

यावेळी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांचे ‘अवयव दान’ या विषयावर व्याख्यान व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
Department of Pediatric Cardiac Science KIMS hospital Thane येथून उल्हास पाटील यांनी मोफत Paediatric Cardiac surgery याबद्दल माहिती दिली.
आरोग्य शिबिरा दरम्यान श्री माऊली जत्रेत एका वृद्ध महिलेला उष्माघता मुळे चक्कर आली हे कळल्यावर त्वरित डॉ. आठवले आणि टीम SSPM त्या ठिकाणी जाऊन BP, Pulse, Sugar चेक करून त्यांना योग्यतो विद्यकीय सल्ला देऊन औषध दिले. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी मनीष यादव, नारायण शृंगारे यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles