सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी तालुक्यातील मडूरा येथील ११ हजार व्होल्ट बेकायदेशीर पोल प्रकरणी सुशील चौगुले (माहिती अधिकार पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य) यांनी दिनांक २६ जानेवारी पासून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
दरम्यान जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या सहा ‘त्या’ भ्रष्ट अधिकारी यांच्यासह गावातील संबंधित ५ इसमांविरुद्ध विरुद्ध उच्च न्यायालयiत रिट पिटिशन दाखल प्रक्रियेत त्यांना दिलेलi ७ दिवसांचा नोटीस कालावधी आज संपुष्टात आल्यामुळे आज ३७ व्या दिवशी उपोषण स्थगित करण्यात आले आहे. असे उपोषणकर्ते श्री. चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.



