‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृतीसाठी सावंतवाडीत बाईक रॅली.

सावंतवाडी : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत अभय केंद्र सावंतवाडी यांच्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमाअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरात बाईक रॅली काढून नागरिकांमध्ये मुलींच्या शिक्षण व संरक्षणाबाबत जागृती करण्यात आली.
या रॅलीचा प्रारंभ सावंतवाडी पोलीस स्टेशन येथून करण्यात आला असून नगरपरिषद सावंतवाडी येथे तिचा समारोप झाला. रॅलीदरम्यान ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या संदेशाचे फलक आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला नगरपरिषद महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, तालुका संरक्षण अधिकारी श्री. पुरुषोत्तम पाटील, सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या पीएसआय सौ. माधुरी मुळीक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सावंतवाडीच्या सौ. घाडीगावकर व सौ. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस, सावंतवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा महिला व बालविकास विभाग सिंधुदुर्गचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण, संरक्षण आणि सशक्तीकरण याबाबत समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रॅलीला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles