वकील मालकाचे ३ लाख रुपये घेऊन परप्रांतीय ड्रायव्हर फरार! ; सावंतवाडी येथील घटना.

सावंतवाडी : दिनांक 08/03/2026 रोजी रात्री 8 ते 09/03/2026 रोजी सकाळी 10 वाजताचे सुमारास नवसरणी रोड, लक्ष्मी लिलया, न्यू खासकिल वाडा जेलच्या मागे या फिर्यादी वकील यांचे भाड्याचे बंगल्यातील वकिली व्यवसायाचे ऑफिसमध्ये येथे त्यांचा चालक कामगार मयंक द्वारकाप्रसाद मिश्रा (वय -31 वर्ष, मूळ राहणार बैतुल, मध्य प्रदेश, सध्या राहणार न्यू खासकिलवाडा जेलच्या मागे , तालुका सावंतवाडी) याने वकिलांचे ड्रॉवर मधील रोख रक्कम ३ लाख त्यांना न विचारता रुपये चोरून नेले व त्याचे दोन्ही मोबाईल स्विच ऑफ येत आहेत व तो अद्याप रक्कम घेऊन आला नाही म्हणून दिले तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात मयंक मिश्रा यांच्याविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे हे करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles