आज शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हाञे यानी सिंधुदुर्गच्या शिक्षणाधिकारी शिंपी यांच्यावर विधान परिषदेत लक्षवेधी आणून अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केले.मुळात आमदारांनी केलेले हे आरोप नसून हे भयंकर वास्तव आहे.हा शिक्षणाचा बाजार गेली अनेक वर्षापासून सुरू आहे.यासाठी खास दलालांमार्फत हे सर्व व्यवहार केले जातात.
म्हाञे यानी शिंपी यांच्या कथीत भ्रष्ट कार्यपद्धतीवर विधान परिषदेत पाढाच वाचला.अल्पसंख्याक शिक्षकांची मान्यता देण्यासाठी पैशांची मागणी करणे,पैसे दिले नाहीत तर अशी प्रकरणे प्रलंबित ठेवणे.वरिष्ठ श्रेणी मान्यतेसाठी पण दरपञक ठरलेले आहेत.यासाठी काही शाळांमधील कर्मचारीच आपले कमिशन घेऊन मध्यस्थी करत असतात. सर्वात कहर म्हणजे एका विधवा महिलेकडून तिच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तब्बल तीन लाख रुपये घेतले त्यासाठी त्या बिचार्या महिलेने आपले मंगळसूत्र विकले असाही गंभीर आरोप आमदार म्हाञे यानी केलेला असून शिंपी यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याना तातडीने निलंबित करा अशी मागणीही आमदार महोदयांनी केली.
शिक्षण मंञी भुसे यानी थातूरमातूर खुलासा करून सिंधुदुर्ग जिल्ह्या परिषदेचे सिंईओ मार्फत चौकशी करून पंधरा तारखेपर्यंत अहवाल सादर करणार असल्याचे आश्वासन दिले.
शिंपी यांच्या या एकंदरीत कार्यपद्धती बाबत शिक्षक संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केलेली आहेत.आमदार म्हाञे यानी सुध्दा अनेकदा शिक्षक संघटना व शिंपी यांच्या संयुक्त बैठका घेऊन हे सर्व विषय मांडलेले होते माञ या सर्वाना शिंपी मॅडम यानी या सगळ्याना चुना लावला.
शिक्षण क्षेत्रातील हा भ्रष्टाचार काही नविन नविन नाही.जोपर्यंत भ्रष्टाचारी पकडला जात नाही तोपर्यंत तो भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध होत नाही.या जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी कडू यांचे अनेक कारनामे मी आठ वर्षापूर्वी उजेडात आणले होते.माहितीच्या अधिकारात माहिती मिळवण्यासाठी आयुष्यातील वेळ आणि पैसा खर्च करून कोल्हापूर, कोकणभवन येथे हेलपाटे मारलेले होते..मात्र अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवणारे काही आका प्रत्येक जिल्ह्यात आहेत आणि त्यामुळे त्याना अभय असते.
अनेक शिक्षकांची प्रकरणे जर परिपूर्ण असतील तर ती प्रलंबित ठेवण्याचे सबळ कारण काय ? याचा शोध घेतल्यावर लक्षात येईल की टेबला खालून व्यवहार झाल्याशिवाय फाईल हालत नाहीत. शिक्षणाच्या या बाजाराला जसे अधिकारी जबाबदार आहेत तसेच आपले काम करून घेण्यासाठी लाच देणारे शिक्षकही तेवढेच जबाबदार आहेत.टाळी कधीही एका हाताने वाजत नाही.
– ॲड.नकुल पार्सेकर.
सावंतवाडी.



