वेंगुर्ला: इंडियन टॅलेंट ओलिंपियाडतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत इयत्ता ६ वी मधील कु. शौर्य शंकर मांजरेकर हा विज्ञान विषयात राज्यात सहावा आला आहे तसेच कु.पल्लव संजय मेस्त्री याला गणित विषयात एक्सीलेंस मेडल अवॉर्ड मिळाला आहे. हे यश त्यांना अभ्यास,चिकाटी अथक परिश्रम तसेच पालकांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे प्राप्त झाले आहे. यासाठी दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिताली होडावडेकर यांनी गुणगौरव केला आहे.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे, शौर्यने यापूर्वी इयत्ता ५ वीमध्ये शिष्यवृत्ती मिळवली असून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही पटकावले आहेत. कुमार शौर्यच्या यशात त्याची आई उपक्रमशील शिक्षिका व कवयित्री सौ.शामल शंकर मांजरेकर – पिळणकर हिचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
तसेच याच शाळेतील कु.पल्लव संजय मेस्त्री याला गणित विषयात एक्सीलेंस मेडल अवॉर्ड मिळाला आहे.हे यश त्यांना अभ्यास,चिकाटी अथक परिश्रम तसेच पालकांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे प्राप्त झाले आहे. यासाठी दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिताली होडावडेकर यांनी गुणगौरव केला आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



