सावंतवाडीत २४ व २५ मार्चला राष्ट्रीय टेकफेस्ट ‘क्वांटेक्झेरा २०२६’ चे आयोजन. ; तंत्रज्ञानाच्या महाउत्सवासाठी भोसले नॉलेज सिटी सज्ज!

सावंतवाडी: जिल्ह्यातील तंत्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या भोसले नॉलेज सिटी येथे यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने २४ व २५ मार्च रोजी ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या भव्य राष्ट्रीय टेक फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रत्येकासाठी शाश्वत तंत्रज्ञान’ हे ब्रीदवाक्य घेऊन संपन्न होणाऱ्या या महोत्सवात एकूण ३ लाख रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके विजेत्यांना दिली जाणार आहेत.

या दोन दिवसीय कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ‘ऑटो आणि टेक एक्स्पो’ असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि तांत्रिक कौशल्याला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ मार्च रोजी टेक्निकल क्वीझ, फोटोग्राफी आणि वादविवाद स्पर्धा रंगणार आहेत. २५ मार्च रोजी ब्लाइंड सी कोडिंग आणि रोबो रेस यांसारख्या आव्हानात्मक स्पर्धा पार पडतील. सोबतच प्रोजेक्ट कॉम्पिटिशन व रील मेकिंग स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधन सादर करण्याची संधी मिळणार आहे.

यावेळी नामवंत तज्ज्ञांची व्याख्याने आणि पॅनेल डिस्कशनचेही आयोजन करण्यात आले आहे. यात भविष्यातील तंत्रज्ञान आणि करिअरच्या संधी यावर मार्गदर्शन केले जाईल. या टेक्निकल फेस्टसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांनी www.quantexera.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles