सावंतवाडीत प्रचंड खळबळ! – करोडपती सागर कारिवडेकरचा आलिशान बंगला पोलिसांनी केला सील.

सावंतवाडी : शहरात आज अक्षरशः खळबळ माजली, जेव्हा आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात मोठी उलथापालथ करत संशयित सागर कारिवडेकर यांच्या आलिशान बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकत जप्तीची नोटीस लावून ताबा घेतला. या कारवाईने शहरात भीती, संताप आणि प्रचंड चर्चा निर्माण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्र पोलीस यांच्या ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट कारवाई करत संबंधित बंगल्यातील सर्व मालमत्ता गुन्ह्यातील जप्त मालमत्ता म्हणून घोषित केली. नोटीसमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही त्या परिसरात प्रवेश करू शकणार नाही.
ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमे तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ नुसार ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर सावंतवाडीमध्ये राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून “आता पुढचा नंबर कोणाचा?” असा सवाल जोर धरू लागला आहे. तपासाची साखळी लांबणार असल्याचे संकेत मिळत असून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकेकाळी वैभवाचे प्रतीक असलेला हा बंगला आता गुन्हेगारी तपासाचा केंद्रबिंदू ठरला असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणावर खिळले आहे!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles