कणकवली : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तसेच सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ या निवासस्थानी भेट देत त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी भोंसले यांनी पुढील काळातही खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण व सर्वांभौम विकास घडत राहो, तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी सौ. नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित ‘ए पी जे अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन’ हे अरुण तिवारी लिखित व सकाळ प्रकाशन प्रा. लि. यांनी प्रकाशित केलेले पुस्तक भेट देण्यात आले.



