सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील फॅशनप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले ‘रोवस्त्र’ हे भव्य-दिव्य, सुसज्ज आणि अत्याधुनिक कपड्यांचे दालन सध्या विशेष चर्चेत आहे. आधुनिकतेचा साज, स्टायलिश डिझाईन्स, ट्रेंडी कलेक्शन आणि किफायतशीर दर यांचा अप्रतिम संगम असलेल्या या दालनाला मराठी सिनेविश्वातील गुणवंत अभिनेत्री व कोकण कन्या वैष्णवी कल्याणकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.
या वेळी ‘रोवस्त्र’चे संचालक रोहन परब यांनी अभिनेत्रीचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी प्रशांत मोरजकर यांनीही गुण्या अभिनेत्रीचे स्वागत करत उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

भेटीदरम्यान अभिनेत्री कल्याणकर यांनी ‘रोवस्त्र’च्या भव्यतेचे, आकर्षक मांडणीचे आणि दर्जेदार कलेक्शनचे मनापासून कौतुक केले. “फॅशनच्या या झपाट्याने बदलणाऱ्या युगात ट्रेंड, गुणवत्ता आणि परवडणारे दर यांचा सुंदर मिलाफ ‘रोवस्त्र’मध्ये अनुभवायला मिळतो. हे दालन म्हणजे ब्रँडेड वस्त्रसंपदेचा खजिना असून सावंतवाडीकरांसाठी ही एक मोठी भेट आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
विशेष म्हणजे, या दालनातील आलिशान इंटिरिअर, आकर्षक लाईटिंग, नीटनेटकी मांडणी आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे ‘रो वस्त्र’ हे केवळ खरेदीचे ठिकाण न राहता एक फॅशन डेस्टिनेशन बनले आहे. महिला, पुरुष व युवांसाठी अद्ययावत आणि स्टायलिश कलेक्शनची रेलचेल येथे पाहायला मिळते.
याचबरोबर ‘रो वस्त्र’मध्ये एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरणही पार पडले असल्याने या दालनाच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे.
या प्रसंगी रोहन परब यांनी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर व त्यांच्या टीमचे आभार मानले. “सावंतवाडीकरांना महानगरांप्रमाणेच अत्याधुनिक आणि दर्जेदार फॅशन येथेच उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ‘रो वस्त्र’मुळे आता सावंतवाडीकरांना मुंबई, कोल्हापूर किंवा बेळगाव यांसारख्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
✨ ‘रो वस्त्र’ – फॅशन, स्टाईल आणि किफायतशीरतेचा अनोखा संगम! ✨



