कवयित्री, कादंबरीकार उषा परब लिखित ‘स्त्रियांची ओवी साज आणि स्वरूप’ व ‘निसरड’ या दोन्ही पुस्तकांचा २६ एप्रिल रोजी रोजी विलेपार्ले येथे प्रकाशन सोहळा! ; पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांसह साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.

मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई जिल्हा यांच्या वतीने कवयित्री, कादंबरीकार व नाटककार प्रा. उषा परब लिखित ‘स्त्रियांची ओवी साज आणि स्वरूप’ या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ यांनी केले आहे. तसेच दुसरे पुस्तक ‘निसरड’ हा कथासंग्रह डिंपल प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केला असून या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. २६ एप्रिल २०२६) सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. विलेपार्ले (पूर्व) येथील केशवराव घैसास ऑडिटोरियम येथे हा सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी को.म.सा.प. संस्थापक, ‘विश्व मराठी साहित्य भूषण’ सन्मानित पद्मश्री मधु मंगेश कर्णिक राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ तसेच को.म.सा.प. केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी निमंत्रित मान्यवर म्हणून ज्येष्ठ लेखिका मोनिका गजेंद्रगडकर व लेखक तथा समीक्षक डॉ. अजित मगदूम उपस्थित राहणार असून, सन्माननीय अतिथी म्हणून रेखाताई नाईक, अनुप कर्णिक, एल. बी. पाटील व दीपा ठाणेकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यात प्रा. उषा परब लिखित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार असून, साहित्यप्रेमींना एक आगळावेगळा अनुभव मिळणार आहे. कार्यक्रमात साहित्यिक विचारांची देवाणघेवाण तसेच लेखक-रसिक संवादाचीही संधी उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा हा सोहळा ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles