‘शब्दांपेक्षा कृतीवर भर, खड्डेमुक्तीचा नवा आदर्श’, ॲड. रुजूल पाटणकर यांची धडाकेबाज सामाजिक कामगिरी! ; स्वखर्चाने बुजवले रस्त्यांवरील खड्डे!

  • रूपेश पाटील
  • सावंतवाडी : शब्दांपेक्षा कृती मोठी असते, याचा जिवंत प्रत्यय सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते ॲड. रुजूल पाटणकर यांनी आज पुन्हा एकदा घडवून दाखवला आहे. सर्वोदय नगरातील रस्त्यांची दुरवस्था पाहून केवळ टीका न करता त्यांनी थेट कृतीचा मार्ग निवडत स्वखर्चाने रस्त्यांवरील धोकादायक खड्डे बुजवून एक आदर्श निर्माण केला आहे.
  • सर्वोदय नगर ते शिक्षक कॉलनी परिसरातील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे हे अपघातांना आमंत्रण देत होते. प्रशासनाच्या प्रतिक्षेत वेळ न घालवता ॲड. पाटणकर यांनी स्वतः पुढाकार घेत हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून रस्ते अधिक सुरक्षित झाले आहेत.
    शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान सातत्याने देणारे ॲड. पाटणकर यांनी यावेळीही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत कृतीतूनच संदेश दिला. “रस्त्यांवरील खड्डे हे अपघाताचे मुख्य कारण ठरू शकतात. समाजाचे काहीतरी देणे लागते, या भावनेतून हा छोटासा प्रयत्न केला,” असे त्यांनी सांगितले.
  •  
    या उपक्रमामुळे सर्वोदय नगर व शिक्षक कॉलनीतील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे जोरदार कौतुक होत आहे.
  • फक्त बोलणाऱ्यांच्या गर्दीत ‘करणारा’ म्हणून उभा राहिलेला हा चेहरा अर्थात ॲड. रुजूल पाटणकर आज सावंतवाडीकरांसाठी खऱ्या अर्थाने ‘रिअल हिरो’ ठरला आहे!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles