निरवडे – कोनापाल येथे १ मे रोजी भव्य उत्सव! ; महाराष्ट्र दिन व शिवशक्ती कला क्रीडा मित्र मंडळाच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन. ; ‘लग्नाआधी वरात’ नाटकासह विविध कार्यक्रमांची रेलचेल.

सावंतवाडी : शिवशक्ती कला क्रीडा मित्र मंडळ, निरवडे – कोनापाल यांच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मंडळाचा ३५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवार, १ मे रोजी दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.
उत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून होणार असून, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी ६ वाजता सुमधुर भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता मान्यवरांचे स्वागत व लहान मुलांचा गुणगौरव सोहळा पार पडणार आहे.
उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे रात्री १० वाजता सादर होणारे कौटुंबिक व तुफान विनोदी नाटक ‘लग्नाआधी वरात’, ज्याची रसिकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.
हा भव्य कार्यक्रम निवडे–कोनापाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आला असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवकालीन परंपरा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक जतन यांचा संगम असलेला हा उत्सव यंदाही दिमाखात साजरा होणार असून, सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवशक्ती कला क्रीडा मित्र मंडळ, निरवडे – कोनापाल व शिवशक्ती मित्र मंडळ, मुंबई यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles