सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय ओरोस येथे आयोजित करण्यात आलेल्या एनसीसीच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिरामध्ये कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या छात्रसैनिकांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या शिबिरातील विविध स्पर्धांमध्ये कॅडेट दुर्वांग किशोर वालावलकर तसेच कॅडेट कनिष्का आत्माराम जळवी यांनी वक्तृत्व (डिबेट) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तसेच सांघिक क्रीडा प्रकारामध्ये कॅडेट राजदीप उदय बांदेलकर आणि कॅडेट अक्षरा मारुती गवळी यांनी उपविजेतेपद प्राप्त करून प्रशाळेचा गौरव वाढविला.
दहा दिवसांच्या खडतर निवासी प्रशिक्षणादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत हे यश मिळविले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री एस. व्ही.भुरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.
हे निवासी प्रशिक्षण शिबिर कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयराज तथा लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. विद्यार्थ्यांना प्रशाळेचे सहाय्यक शिक्षक व एन.सी.सी. अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


