सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७२ केंद्र प्रमुख भरतीची अंतरिम यादी प्रसिद्ध.

सिंधुदुर्ग : केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांच्या एकूण जागांच्या ५० टक्के जागा भरण्याची कार्यवाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. या प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील ७२ केंद्रप्रमुख पदे भरली जाणार आहेत. शनिवारी याची अंतरिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.
केंद्रप्रमुख पदभरतीच्या निकषांमध्ये शासनाने बदल केला असून नवीन निकालाप्रमाणे पन्नास टक्के पदे पदोन्नतीने, तर ५० टक्के पदे विभागीय स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार भरली जाणार आहेत. दरम्यान फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रप्रमुख पदासाठीची विभागीय परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १३ मार्च रोजी जाहीर झाला आहे. त्यानुसार या परीक्षेला बसलेल्या शिक्षकांची गुणानुक्रमे यादी जाहीर करण्यात आली होती. तसेच निवडीबाबतचे निकषही जाहीर करण्यात आले.

पात्रतेसाठी संबंधित शिक्षक उमेदवाराची एक जानेवारी २०२६ रोजी किमान सहा वर्षे सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. तसेच ३ फेब्रुवारी २०२६ रोजी त्या उमेदवाराने टीईटी / सीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख भरतीची प्रक्रिया हाती घेतली. जिल्ह्यात १४४ केंद्र प्रमुख पदे मंजूर असल्याने ७२ पदे भरली जाणार आहेत. ‘एकास अडीच” या प्रमाणानुसार ७२ पदांसाठी १८० उमेदवारांची कागदपत्र पडताळणीची कार्यवाही ११ जून रोजी करण्यात आली. त्यानुसार पात्र उमेदवारांची आंतरिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीतील त्रुटीवर आक्षेप नोंदविण्यासाठी एका दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे. या यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. यामुळे अतिरिक्त चार्ज सांभाळणाऱ्या शिक्षकांचा ताण कमी होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles