सांगेली येथे शुल्लक कारणावरून दाम्पत्याला मारहाण. ; दोघांविरुद्ध सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल.

सावंतवाडी : “माझी गावात इज्जत घालवली” या कारणावरून संतापलेल्या दोघांनी एका दाम्पत्याला दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सांगेली येथे घडली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्कर वामन गावडे (वय ५०)शुभम दत्ताराम गावडे (वय २९, दोघेही रा. सांगेली) यांनी पुरुषोत्तम रामचंद्र राऊळ व त्यांची पत्नी प्रमिला पुरुषोत्तम राऊळ यांना शुल्लक कारणावरून मारहाण केली. “माझी गावात इज्जत घालवली” असा आरोप करत दोघांनी राऊळ दाम्पत्यावर दांडक्याने हल्ला केला. तसेच डोक्यावर व हातावर मारहाण करत लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करून “तुम्हाला सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही घटना आज दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास श्री. राऊळ यांच्या घरासमोर घडली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भास्कर गावडे व शुभम गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles