योगातून निरोगी जीवनाचा संदेश, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावंतवाडी पोलीस ठाण्यात उत्साहात योगाभ्यास! ; अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्डांचा उत्स्फूर्त सहभाग, योगशिक्षक बाबली गवंडे यांचे मार्गदर्शन.

सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत विशेष योगाभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि तणावमुक्त जीवनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला पोलीस अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात योगशिक्षक बाबली गवंडे यांनी विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणेचे महत्त्व समजावून सांगत उपस्थितांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर आणि मन सुदृढ राहण्यास मदत होते, तसेच दैनंदिन कामकाजातील तणाव कमी करण्यासाठी योग उपयुक्त असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या योग शिबिरात सावंतवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड मिळून एकूण २४ जणांनी सहभाग घेतला. शिस्त, आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैली यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे पोलीस दलामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

“योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याचा प्रभावी मंत्र आहे,” असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles