योगाच्या श्वासातून आरोग्याचा संस्कार!, इन्सुली जि.प. शाळा क्रमांक ५ येथे जागतिक योग दिन उत्साहात. ; चिमुकल्यांनी आत्मसात केली योगसाधना, निरोगी जीवनाचा दिला संदेश.

सावंतवाडी : आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक समस्यांवर योग हे प्रभावी उत्तर असल्याचा संदेश देत तालुक्यातील इन्सुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ५ मध्ये जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करत निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना विविध योगासने प्रत्यक्ष करून दाखविण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने योगाभ्यासात सहभाग घेतला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर माजगांवकर, उपशिक्षक सुधीर गावडे आणि हंसराज गवळे यांनी विद्यार्थ्यांना योगामुळे शरीर सुदृढ, मन प्रसन्न आणि बुद्धी एकाग्र राहण्यास मदत होते, असे सांगितले. नियमित योगसाधना ही निरोगी आणि संतुलित जीवनाची गुरुकिल्ली असून, विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.

योगाभ्यासादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही जपले जाते, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

“योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवनाचा पाया आहे,” हा संदेश इन्सुली शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून दिला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles