‘रंगांतून नशामुक्तीचा संदेश, घोषवाक्यांतून समाजप्रबोधन’; ‘आरपीडी’मध्ये जनजागृतीचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात!

सावंतवाडी: केंद्र शासनाच्या नशामुक्ती जनजागृती अभियानाअंतर्गत प्राप्त परिपत्रकानुसार राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला सामाजिक जाणीवेची जोड देणाऱ्या या स्पर्धेत इयत्ता बारावीच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नशामुक्त समाजाच्या निर्मितीचा प्रभावी संदेश आपल्या कलाकृती आणि घोषवाक्यांतून साकारला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी प्राचार्या डॉ. सुमेधा नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, “नशामुक्त समाजाची निर्मिती ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून समाजमन जागृत करून व्यसनमुक्त भारत घडविण्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा,” असे प्रेरणादायी आवाहन केले. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रभारी उपप्राचार्या सविता माळगे, स्पर्धा समिती प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, स्पर्धा समिती सदस्या डॉ. संजना ओटवणेकर, प्रा. ज्योती सावंत, प्रसिद्धी समिती प्रमुख डॉ. अजेय कामत, प्रा. वनिता घोरपडे, प्रा. रणजित राऊळ, प्रा. पवन वनवे, प्रा. रणजित माने, प्रा. राहुल कदम, जोसेफ डिसिल्वा, निलेश कळगुंटकर, माया नाईक, स्पृहा टोपले, प्रा. दशरथ सांगळे, प्रा. महाश्वेता कुबल आणि प्रा. केदार म्हसकर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

सकाळी ९.३० वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला सामाजिक बांधिलकीची जोड देत व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि नशामुक्त जीवनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडणारी आकर्षक पोस्टर्स तसेच परिणामकारक घोषवाक्ये सादर केली. स्पर्धेसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत वेळ देण्यात आला.

स्पर्धेचे परीक्षण योगेश गावित यांनी केले. पोस्टर आणि घोषवाक्य या दोन्ही विभागांतील सादरीकरणांचे बारकाईने परीक्षण करून त्यांनी विजेत्यांची निवड जाहीर केली.

पोस्टर स्पर्धा विजेते –

🥇 प्रथम : अथर्व तिवरेकर (इ. १२ वी कला – ब)
🥈 द्वितीय : प्राची परब (इ. १२ वी विज्ञान – ब)
🥉 तृतीय : सानिका गोसावी (इ. १२ वी कला – ब)

घोषवाक्य स्पर्धा विजेते –

🥇 प्रथम : ओम राऊत (इ. १२ वी कला – क)
🥈 द्वितीय : रिया सावंत (इ. १२ वी वाणिज्य – ड)
🥉 तृतीय : वेदिका पिळणकर (इ. १२ वी वाणिज्य – ड)

संपूर्ण स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून रंग, शब्द आणि विचार यांच्या माध्यमातून ‘नशामुक्त समाज’ हा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. उपस्थित मान्यवरांनी सर्व स्पर्धकांच्या सर्जनशीलतेचे मनापासून कौतुक करत विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही अशा सामाजिक जनजागृतीपर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून समाज परिवर्तनात आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. ही स्पर्धा केवळ गुणवत्तेची चुरस न ठरता, सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जागवणारा आणि व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी युवा पिढीला प्रेरणा देणारा संस्कारमय उपक्रम ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles