सतत परिश्रम, ध्येयाप्रती निष्ठा अन् आत्मविश्वासाच्या बळावरच ओंकारची सुवर्ण कामगिरी! : भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांचे गौरवोद्गार. ;विशाल परब यांच्या हस्ते गुणवंताचा गौरव! ; मालवणच्या ओंकार गावकरच्या यशाने सिंधुदुर्गची मान अभिमानाने उंचावली!

मालवण : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणेचा क्षण ठरतो. अशाच एका अभिमानास्पद क्षणाला आज साक्षीदार होत सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांनी एमआयटी, पुणे येथे ९७.६० टक्के गुणांसह संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. ओंकार विकास गावकर यांचा मनःपूर्वक सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव केला.

मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यभर अभिमानाने उंचावणाऱ्या ओंकार गावकर यांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि चिकाटीला भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी सलाम करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “यशाला शॉर्टकट नसतो; सातत्यपूर्ण परिश्रम, ध्येयाप्रती निष्ठा आणि आत्मविश्वास यांच्या बळावरच अशी सुवर्ण कामगिरी घडते. ओंकारने मिळवलेले हे यश संपूर्ण सिंधुदुर्गसाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यातही तो उच्च शिखरे सर करून राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास आहे.”

या सत्कारप्रसंगी उपस्थितांनी ओंकार गावकर यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

ज्ञानाचा सन्मान, गुणवंताचा गौरव आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारा हा सन्मान सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles