शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणारा सामाजिक संकल्प! ; भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते आजगाव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटपाचा शानदार शुभारंभ!

सावंतवाडी: “विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची शिदोरी, शिक्षणाच्या वाटेवर नवी उमेद” या भावनेतून महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांनी आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करत सामाजिक बांधिलकीचा आणखी एक आदर्श निर्माण केला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याची भूमिका जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विशाल परब यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य सहज उपलब्ध व्हावे, त्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सक्षम व्हावा आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य खुलावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम संपूर्ण मतदारसंघात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कोणतीही निवडणूक समोर नसताना केवळ समाजहित आणि शिक्षणाविषयीची तळमळ या भावनेतून विशालजी परब सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे जनतेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होत असून त्यांच्या या शैक्षणिक उपक्रमाचे आजगांव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.


यावेळी भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, आजगांवचे माजी सरपंच रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, ओंकार आजगांवकर, अमित आजगांवकर, गिरीश परब, निल झांट्ये, गोविंद वैज, दीपक हळदणकर, अभिषेक फेद्रे, ओम आजगांवकर, मुख्याध्यापिका सौ. म्हाडगुत, शाळेतील शिक्षकवर्ग, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles