अभिमानास्पद! – सलग चौथ्या वर्षी गुणवत्ता यादीत झळकली इन्सुली नं. ५ शाळा. ; शिष्यवृत्ती परीक्षेत १०० टक्के यश!

सावंतवाडी : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इयत्ता पाचवी) मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, इन्सुली नं. ५ ने उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत कु. दिपश्री दिपेश सावंत हिने २२० गुण मिळवत ग्रामीण सर्वसाधारण जिल्हा गुणवत्ता यादीत ४२ वा क्रमांक पटकावला. तसेच कु. खुशबू सुनील सावंत हिने १८६ गुण मिळवत उत्कृष्ट यश संपादन केले.

विशेष म्हणजे, परीक्षेला बसलेल्या दोन्ही विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याने शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यासोबतच सलग चौथ्या वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

या यशासाठी विद्यार्थिनींना वर्गशिक्षक व मार्गदर्शक सुधीर गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक भास्कर माजगावकर आणि सहाय्यक शिक्षक हंसराज गवळे यांचे सहकार्य लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल इन्सुली केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख  लक्ष्मीदास ठाकूर, गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपेश सावंत, तसेच समितीचे सर्व सदस्य यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles