नेमळे येथे मांसवाहू कार पलटी! ; तब्बल ६०५ किलो गोवंशसदृश मांस जप्त, चालक अटकेत, ३ दिवसांची पोलीस कोठडी..

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील नेमळे (फौजदारवाडी) येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत ६०५ किलो गोवंशसदृश मांस जप्त केले. या प्रकरणी वाहनचालकास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीस ३ दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम दावलसाब यालवट्टी (वय ३१), रा. बेटीम, उत्तर गोवा (मूळ रा. मुलगुंड, जि. गदग, कर्नाटक) हा KA-51-MN-0470 क्रमांकाच्या एर्टिगा कारमधून निपाणी येथून गोवा (आरपोरा) येथे गोवंशसदृश प्राण्याचे सुमारे ६०५ किलो मांस घेऊन जात होता.

सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास नेमळे येथील फौजदारवाडी परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथम रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर ती सुमारे ५० फूट अंतरावर जाऊन महामार्गाच्या उजव्या बाजूला पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले.

त्यानंतर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने पोलीस ठाणे आवारात आणण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मांसाचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून, संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, जमादार मनोज राऊत, सावळ, हवालदार अनिल धुरी, सुरेश धोत्रे, सुरेश पाटील, प्रवीण वालावलकर, मंगेश शिंगाडे, महेश निरवडेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल भूषण भोवर यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles