सलमान खानवर का आलीये मुंबईतील घरे विकण्याची वेळ? ; वांद्रे येथील आणखी एक फ्लॅट विकला.

मुंबई : अभिनेता सलमान खान आता कोणत्या सिनेमामुळे नाही तर, प्रॉपर्टीमुळे चर्चेत आला आहे. सलमान याने वांद्रे येथील पॉश परिसरातील फ्लॅट विकला आहे. सांगायचं झालं तर, सलमान याचं वांद्रे या शहराशी एक घट्ट् नातं आहे. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. पण सलमान याने हाच अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकल्याची माहिती समोर येत आहे. यातून अभिनेत्याला मोठा फायदा देखील झाला आहे. याबद्दल आता मोठी माहिती समोर येत आहे.

कोणी घेतला आहे सलमान खानचा फ्लॅट?

प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांनुसार, सलमान खानने हा फ्लॅट 2015 मध्ये 2.88 कोटी रुपयांना खरेदी केला होता. म्हणजे, जवळपास 11 वर्ष त्या फ्लॅटमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्याने फ्लॅट विकला आहे. ज्यातून भाईजानला मोठा फायदा झाला. हा फ्लॅट वांद्रे पश्चिम येथील ‘शिव-अस्थान हाइट्स’ या प्रसिद्ध रेसिडेंशियल बिल्डिंगमध्ये स्थित आहे. कागदपत्रांनुसार, मुनिरा अकबरअली दांडावाला, महदीअली अकबरअली दांडावाला आणि झेहरा महदीअली दांडावाला यांच्या नावावर सलमानचा फ्लॅट खरेदी करण्यात आला आहे.

फ्लॅटसोबत दोन कार पार्किंगची जागा –

या फ्लॅटचा कार्पेट एरिया 758 चौरस फूट असून, त्यासोबत दोन कार पार्किंगच्या जागा देखील सामिल आहेत. या व्यवहाराची नोंदणी 9 जुलै 2026 रोजी झाली. या व्यवहारासाठी खरेदीदारांनी 21 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस भरली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या घराची चर्चा रंगली आहे.

सलमान खानने गेल्या वर्षीही एक फ्लॅट विकला होता –

सलमान खानने ‘शिव-अस्थान हाइट्स’ मधील एक फ्लॅट गेल्या वर्षी विकलेला. जुलै 2025 मध्ये त्याने याच इमारतीतील एक मोठा फ्लॅट 5.35 कोटी रुपयांना विकला होता. विशेष म्हणजे, सलमान खानने मुंबईतील अनेक व्यावसायिक आणि निवासी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे.

सलमान खान लवकरच नवीन घरात होणार शिफ्ट!

समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान खान याच्या नवीन घराचं काम सुरु आहे. आई सलमा खान यांच्या जागेवर खान कुटुंबियांचं नवीन घर तयार होणार आहे. ही जागा खान कुटुंबियांनी 2011 मध्ये खरेदी केलेली. सलमान खानच्या कुटुंबाला वांद्रे येथील चिंबई भागात एक नवीन निवासी टॉवर उभारण्यासाठी ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी’ची (MCZMA) मंजुरी मिळाली आहे. नवीन घरात संपूर्ण खान कुटुंबिय एकत्र राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles