विनायक राऊत, गितेश राऊत यांना तात्काळ अटक करा, भाजपा गिरीजा राऊत यांच्या पाठीशी ठाम! : मोहिनी मडगावकर. ; स्वतःच्या घरातील महिलेलाच न्याय मिळत नसेल तर ठाकरे शिवसेनेतील इतर महिलांची स्थिती काय? ; भाजपा महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांचा थेट सवाल .

– प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालक मंत्री नितेश राणे यांची भेट घेणार असल्याची घोषणा.

सावंतवाडी : गिरीजा राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचे सांगत, या प्रकरणातील आरोपी विनायक राऊत व गितेश राऊत यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अशी ठाम मागणी भाजपच्या महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या की, “एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल, तर तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही समाजाची जबाबदारी आहे. गिरीजा राऊत यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे.”

मोहिनी मडगावकर यांनी ठाकरे शिवसेनेवरही जोरदार टीका करत प्रश्न उपस्थित केला की, “आज त्यांच्या स्वतःच्या घरातील महिलेलाच जर अशा प्रकारची वागणूक मिळत असेल, तर ठाकरे शिवसेनेतील इतर महिलांना कोणता न्याय मिळत असेल? एका महिलेवर गंभीर आरोप होत असताना ठाकरे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व नेत्या गप्प का आहेत?”

या संपूर्ण प्रकरणाचा भाजपतर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून, संबंधित घटनेची गंभीर दखल घेण्यासाठी लवकरच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शेवटी, “महिलांवरील अन्यायाविरोधातील ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल आणि गिरीजा राऊत यांना न्याय मिळेपर्यंत भाजप शांत बसणार नाही,” असा निर्धार मोहिनी मडगावकर यांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles