सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात १६ ते २३ जुलैदरम्यान हरिनामाच्या अखंड गजरात ‘विठ्ठल रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’. ; आषाढी एकादशीनिमित्त भजन, कीर्तन, संगीत कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन.

सावंतवाडी : येथील श्री विठ्ठल मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या दि. १६ जुलैपासून २३ जुलै २०२६ पर्यंत ‘विठ्ठल रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’ मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात विविध भजनी मंडळे, कीर्तनकार आणि संगीतप्रेमी सहभागी होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल मंदिर उत्सव समितीने केले आहे.

सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिला मंडळांचे भजन, तर सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वारकरी भजन, कीर्तन आणि संगीत कार्यक्रम होणार आहेत. सावंतवाडीसह बांदा, वेंगुर्ले परिसरातील विविध भजनी मंडळे आणि कलाकार आपली सेवा सादर करणार आहेत.

शनिवार, दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पहाटे काकड आरती, श्रींची महापूजा तसेच सायंकाळी हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. २३ जुलै रोजी सप्ताहाची सांगता महाप्रसादाने होणार आहे.

या संपूर्ण सप्ताहात भक्तांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल-रखुमाईंचे दर्शन घेऊन हरिनामाचा आनंद लुटावा, असे आवाहन विठ्ठल मंदिर स्थानिक देवस्थान समिती व विठ्ठल मंदिर उत्सव समिती यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles