– दर्जेदार आरोग्यसेवेत यशराज हॉस्पिटलचे उल्लेखनीय योगदान!
सावंतवाडी : सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध यशराज हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त माहिती अधिकार पदाधिकारी सुशील चौगुले यांनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश नवांगुळ व सौ. मनीषा नवांगुळ यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. तसेच हॉस्पिटलच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यशराज हॉस्पिटल तसेच आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून सावंतवाडी व परिसरातील रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जात आहे. अनुभवी डॉक्टर व कुशल वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून रुग्णसेवेला प्राधान्य देत या संस्थेने अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
या उल्लेखनीय रुग्णसेवेबद्दल डॉ. राजेश नवांगुळ, सौ. मनीषा नवांगुळ तसेच संपूर्ण यशराज हॉस्पिटलच्या टीमचे सुशील चौगुले यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले. ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“आरोग्यसेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. यशराज हॉस्पिटलने रुग्णकेंद्री सेवा देत निर्माण केलेला विश्वास निश्चितच कौतुकास्पद आहे,” असे सांगत चौगुले यांनी हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी यशराज हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.



