सावंतवाडी : महाराष्ट्रात भाजप, शिवसेना व मित्रपक्षांची महायुती एकसंघ आहे. त्यामुळे एखाद्या जागेत अदलाबदल करणे हा महायुतीचाच एक भाग आहे. यापूर्वीही पालघरमध्ये भाजपने शिवसेनेला एका जागेसह उमेदवार देखील दिला होता. नारायण राणे यांचा राजकीय उदय हा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेतूनच झालेला आहे त्यामुळे त्यांचे पुत्र निलेश राणे हे शिवसेनेत येत असतील तर त्यांचे निश्चितच स्वागत आहे, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.



