अत्यंत खळबळजनक! – माडखोलमध्ये २२ वर्षीय महिला वनरक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या!

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल येथे २२ वर्षीय महिला वनरक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने वनविभागासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आश्लेषा मांगले (वय २२, मूळ रा. कोल्हापूर) असे मृत महिला वनरक्षकाचे नाव आहे. त्या आंबोली वनविभागात महिला वनरक्षक म्हणून कार्यरत होत्या. माडखोल येथील आपल्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेतल्याचे आज निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, पुढील वैद्यकीय व कायदेशीर सोपस्कारांसाठी त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे आणण्यात आला आहे. तरुण वयात वनविभागात सेवा बजावत असलेल्या आश्लेषा यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles