खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्नेहसंदेश! ; दूरध्वनीवरून दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा!, राजकीय-सामाजिक वाटचालीस यशासाठी सदिच्छा!

ठाणे/ सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दूरध्वनीवरून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संजू परब यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस उत्तरोत्तर यश लाभो, तसेच जनसेवेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

संजू परब यांच्या कार्यशैलीतील बिनधास्त नेतृत्व, संघटन कौशल्य आणि समाजाशी असलेली घट्ट नाळ यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्याने या शुभेच्छांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नेतृत्वाचा विश्वास, सहकाऱ्यांचा स्नेह आणि जनसेवेची ऊर्जा यांची साथ लाभलेल्या संजू परब यांच्या आगामी वाटचालीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेला हा स्नेहपूर्ण शुभेच्छासंदेश त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles