निशब्द!, मन सुन्न करणारी घटना. ; अमरावतीत हॉस्पिटलला आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू.

अमरावती : अमरावतीमध्ये आज पहाटे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली. या आगीत तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू झाला. पहाटे 3.30 वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात अचानक आग लागली. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3.30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. 9 लहान बाळांना याठिकाणी ठेवले होते. या नवजात शिशु अतिदक्षता विभागात NICU मध्ये एकूण नऊ बालकांवर उपचार सुरु होते. यात तीन बालकांचा मृत्यू झाला. सहा बालकांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत आई-वडिलांनी आपल्या कोवळ्या बाळांना गमावलं आहे. निशब्द, मन सुन्न करणारी ही घटना आहे. रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सर्वसामान्यांच्या मनात या घटनेबद्दल चीड, संतापाची भावना आहे.

ज्या बालकांचं वजन कमी असतं, ज्या मातांची सातव्या महिन्यात प्रसुती होते, ज्या बालकांना जन्मल्यानंतर वाढीमध्ये काही समस्या असतात किंवा डॉक्टरांना ज्या बालकांना विशेष देखरेखीखाली ठेवायचं असतं, अशा बाळांना नवजात शिशु अतिदक्षता विभागात NICU मध्ये ठेवलं जातं. मध्यरात्री 3.30 च्या सुमारास व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग भडकली. सगळा NICU कक्ष या आगीत जळून खाक झाला आहे. दृश्यांमधून या आगीची तीव्रता किती भयंकर होती, ते दिसून येतय. आगीमुळे बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles