श्री देव पाटेकरांचा आशीर्वाद अन् ‘विशाल’ छत्र्यांचा आधार, लघुउद्योजकांकडून युवा नेते विशाल परब यांचे मनःपूर्वक आभार! ; दुसऱ्या श्रावण सोमवारी पाटेकरचरणी भक्तांची मांदियाळी,पावसातही भक्तीचा उत्साह कायम.

सावंतवाडी : श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सावंतवाडीतील ऐतिहासिक राजवाड्यात विराजमान असलेल्या श्री देव पाटेकरांच्या चरणी भक्तिभावाचा अक्षरशः महापूर पाहायला मिळाला. सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाची सर भक्तीच्या उत्साहाला रोखू शकली नाही. ‘पाटेकरचरणी माथा टेकवायचाच’ या श्रद्धेने भाविकांनी पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली.

सावंतवाडीकरांच्या श्रद्धेचे आणि भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या देवस्थानाचे विशेष स्थान आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे भक्तांची मोठी मांदियाळी भरते. दुसऱ्या श्रावण सोमवारीही पहाटेपासूनच भाविकांनी श्री देव पाटेकरांचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ विविध लघुउद्योजकांनी पूजेसाठी आवश्यक फुले, हार, नारळ, प्रसाद तसेच पूजासाहित्याचे स्टॉल थाटले होते. भक्तांच्या गर्दीमुळे या छोट्या व्यावसायिकांना चांगला व्यवसाय मिळत असतानाच, पावसामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे राज्य युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून छत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

रिमझिम पावसाच्या सरी आणि हातात छत्र्यांचा आधार घेत लघुउद्योजक आपला व्यवसाय करताना दिसत होते. त्यामुळे ‘श्री देव पाटेकरांचा आशीर्वाद आणि विशाल छत्र्यांचा आधार’ अशीच भावना या परिसरात अनुभवायला मिळाली.

भक्तांची वाढती गर्दी म्हणजे लघुउद्योजकांसाठीही आशेचा किरण ठरत असून, पावसापासून संरक्षण देणाऱ्या छत्र्यांमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ राजकारण नव्हे, तर स्थानिक छोट्या व्यावसायिकांच्या अडचणींची जाणीव ठेवून त्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात देण्याच्या विशाल परब यांच्या भूमिकेचे लघुउद्योजकांनी कौतुक केले.

श्री देव पाटेकरांच्या आशीर्वादाने भक्तांची पावले मंदिराकडे वळत असताना, पावसाच्या सरींमध्येही लघुउद्योजकांचा व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी मिळालेला छत्र्यांचा आधार त्यांच्यासाठी मोलाचा ठरला. याबद्दल सर्व लघुउद्योजकांनी युवा नेते विशाल परब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

श्रद्धेची मांदियाळी, पावसाची रिमझिम आणि मदतीचा मायेचा हात—दुसरा श्रावण सोमवार सावंतवाडीत भक्ती, सेवा आणि सहकार्याचा सुंदर संगम ठरला!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles