सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियानाला’ जोरदार सुरुवात! ; नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी भाजपचा पुढाकार.

सावंतवाडी : सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देत विकासकामांना गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत असून, सावंतवाडी मतदारसंघात या अभियानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या अभियानातून जिल्ह्यातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच प्रलंबित मागण्यांबाबत संबंधितांकडे निवेदने सादर करण्यात येत आहेत. जनतेच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळवून देणारे हे अभियान ठरत असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

या उपक्रमांतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक संतोष साखरे तसेच महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजपा कोकण विभागाचे संयोजक व प्रदेश प्रवक्ते आ. प्रमोद जठार यांच्याकडे विविध प्रश्नांबाबत निवेदने सुपूर्द करण्यात आली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, कासचे सरपंच प्रविण पंडित, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी आ. प्रमोद जठार आणि संतोष साखरे नागरिकांकडून विविध विषयांवरील निवेदने स्वीकारली आहेत.

“नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी ‘सेवा अभियान’ प्रभावी माध्यम ठरणार आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी भावना यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles