कणकवली : शहरातील त्या लॉजच्या १०५ नंबर च्या खोलीत झालेल्या जुगाराच्या कारवाईचे घटनास्थळ, सहा आरोपींपैकी केवळ पाच आरोपी दाखवण्यात आले. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान याची दखल देखील पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम यांची उपस्थिती होती. यावेळी कारवाईचा इशारा देखील देण्यात आला होता. मग ही कारवाई चौकशी होऊन देखील थांबली कुठे ? बारा दिवसांचा कालावधी लोटला तरी कारवाई झालेली नाही. मागील काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी घेवारी नामक व्यक्तीच्या मटका बुकीवर धाड मारली तेव्हा काही पोलीस अधिकारी कर्मचारी निलंबित झाले होते. मग तसाच काहीसा प्रकार व्हिडीओ, फोटो, सीसीटीव्ही सारख्या बाबी समोर असताना वरिष्ठांच्या चौकशी नंतर कारवाई का नाही ? की यंत्रणेतील च व्यक्ती असल्याने पाठोशी घातले जात आहे ? असा प्रश्न खरतर या निमित्ताने उपस्थित होतो. पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट कारवाईचा इशारा दिलेला असतानाही यंत्रणा त्या अधिकारी कर्मचाऱ्याना पाठीशी घालू पाहते म्हणजे हम करे सो कायदा हे यातून स्पष्ट होत. त्यामुळे यात पालकमंत्री नितेश राणे स्वतः लक्ष देतील का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



