सिंधुदुर्ग जिल्हा बेलीफ संघटनेच्या अध्यक्षपदी डी. आर. गावडे. ; वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची निवड, पदाधिकाऱ्यांचे सभासदांकडून अभिनंदन!

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा बेलीफ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथील संघटनेच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. या सभेत संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी डी. आर. गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी एस. जे. नेवगी, प्रमुख कार्यवाहपदी पी. बी. पवार, कार्यवाहपदी एस. आर. मराठे आणि खजिनदारपदी जी. एन. जाधव यांची निवड करण्यात आली.

तसेच जिल्हा न्यायालय ओरोस प्रतिनिधी म्हणून ए. ए. कुवळेलर, दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) ओरोस प्रतिनिधी बी. डी. सावंत, दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) कणकवली प्रतिनिधी सरवणकर, देवगड प्रतिनिधी पी. टी. जाधव, मालवण (वरिष्ठ स्तर) प्रतिनिधी एस. जे. जिकमडे, कुडाळ प्रतिनिधी एस. बी. पवार, सावंतवाडी प्रतिनिधी आर. बी. सावंत, दोडामार्ग प्रतिनिधी आर. एन. परब आणि वेंगुर्ले प्रतिनिधी एन. डी. जगताप यांची निवड करण्यात आली.

संघटनेच्या सल्लागारपदी एस. एस. ठाकूर आणि व्ही. एस. सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून बेलीफ संघटनेच्या सभासदांच्या विविध प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळावे, अशी अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली.

नवनिर्वाचित ९० सदस्यीय कार्यकारिणीचे संघटनेचे सभासद, हितचिंतक तसेच सहकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles