ईद-ए-मिलादच्या पवित्र पर्वावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला ज्ञानाची नवी उमेद! ; बोर्डवे मुस्लिमवाडी जुम्मा मशीद ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम., शैक्षणिक साहित्य वाटप अन् नात-ए-मुस्तफाचा भक्तिमय नजराणा.

बोर्डवे : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत ईद-ए-मिलाद-उन-नबीचा पवित्र उत्सव बोर्डवे मुस्लिमवाडी येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बोर्डवे जुम्मा मशीद ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाच्या वाटेवर छोट्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

ईद-ए-मिलादच्या जलशानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी नात-ए-मुस्तफाचा विशेष कार्यक्रमही घेण्यात आला. पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनकार्याचा, मानवतेचा आणि प्रेम-सद्भावनेचा संदेश देणाऱ्या नात-ए-मुस्तफामुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बोर्डवे जुम्मा मशीद ट्रस्टने आपली सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपत मुस्लिमवाडी परिसरातील छोट्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. ‘ज्ञानाची ज्योत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावी’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी अॅड. अशपाक शेख, हाफिज सोहेल फैजान शेख, मोहसीन शेख, मौलाना आलम, कुतुबुद्दीन शेख, आसिफ शेख आदी उपस्थित होते. तसेच मुजफ्फर शेख, जाकीर दुदली, आफताब शेख, बशीर शेख, अनवर शेख, इकबाल पटेल यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना आयास शेख यांनी केले. धार्मिक आस्था, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून ईद-ए-मिलादचा मानवतेचा संदेश अधिक प्रभावीपणे अधोरेखित झाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles