न्हावेलीत तंटामुक्तीचा नवा अध्याय!, समितीच्या अध्यक्ष पदी नीतेशा नाईक यांची सर्वानुमते निवड! ; गावातील सलोखा, शांतता आणि सामाजिक एकोप्याची जबाबदारी नव्या युवा नेतृत्वाकडे.

सावंतवाडी : गावातील तंटे सामोपचाराने मिटवून सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोप्याची वीण अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने न्हावेली गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी नीतेशा चंद्रकांत नाईक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

गावाच्या सामाजिक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नीतेशा नाईक यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. गावातील विविध घटकांना विश्वासात घेत, संवाद आणि सामोपचाराच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याला प्राधान्य देत गावातील सलोख्याची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी त्या कार्यरत राहतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या निवडीप्रसंगी सरपंच अष्टविनायक धाऊसकर, ग्रामसेवक राजेश परब, उपसरपंच सागर जाधव, पोलीस पाटील सावळाराम न्हावेलकर, तलाठी कोमल धांदे, माजी उपसरपंच संतोष नाईक, सदस्य सागर धाऊसकर, सद्गुरू सावळदादा हरमलकर, गजानन दळवी, बाबू मेस्त्री, सदस्य आरती माळकर, बोंद्रे, शाळा क्र. १चे शिक्षक उमेश चव्हाण, सीआरपी, ग्रामस्थ तसेच अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

नीतेशा नाईक यांच्या सर्वानुमते झालेल्या निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles