सावंतवाडी : ढोल-ताशांचा गजर, भक्तीच्या रंगात रंगलेले वातावरण, घराघरांत दरवळणारा मोदकाचा गोडवा आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या आगमनाने आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने प्रत्येकाच्या जीवनात नवी पहाट उजाडली आहे.
श्री गणेश चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांनी सर्व गणेशभक्तांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना प्रत्येकाच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होवोत, प्रत्येक कुटुंबाला आरोग्य, यश, समाधान, सुख-समृद्धी आणि भरभराट लाभो, अशी मंगलकामना त्यांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून भक्ती, श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम आहे. गणरायाच्या आगमनाने घराघरांत चैतन्य निर्माण होते, नात्यांमध्ये आपुलकी वाढते आणि समाजमनात एकतेचा संदेश रुजतो. या मंगलमय पर्वाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलावेत आणि सुख-समाधानाची श्रीमंती नांदावी, अशी भावना सुशिल चौगुले यांनी व्यक्त केली.
“श्री गणराय आपल्या जीवनातील सर्व विघ्नांचा नाश करून आरोग्य, यश, समाधान आणि भरभराटीचा आशीर्वाद देवो. प्रत्येकाच्या घरात सुख-समृद्धी आणि आनंद फुलो,” अशी शुभेच्छा त्यांनी दिली.



