मिलाग्रीसचा खेळाडू करन कासरलकरचा जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत डंका! ; अव्वल क्रमांक पटकावून विभागीय स्तरासाठी निवड.

सावंतवाडी : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कुमार करन कासरलकर याने घवघवीत यश संपादन केले आहे. १७ वर्षांखालील गटात झालेल्या थाळीफेक स्पर्धेत करनने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
​या शानदार कामगिरीच्या जोरावर करनची आता आगामी विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाने मिलाग्रीस हायस्कूलच्या क्रीडा परंपरेत आणि शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
​करनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक रिचर्ड सालढाणा यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले. ​तसेच या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून करनवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles