लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर दुश्मन भाऊला अमेरिकेतून उचललं.

नवी दिल्ली : भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील गँगस्टर हिमांशू भाऊला अमेरिकेतून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने हिमांशू भाऊच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याविरोधात हत्या, खंडणी, अपहरणाशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. अमेरिकेच्या तपास यंत्रणेने अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता या हिमांशू भाऊला भारतात आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

हिमांशू भाऊने वयाच्या 17 व्या वर्षी गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवलं. त्याच्याविरोधात हरियाणा, दिल्ली, पंजाबमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. 2022 साली हरियाणात 24 तासांत तीन हत्या झाल्या. तसेच एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबारानंतर हिमांशू भाऊने जबाबदारी घेतली होती. हिमांशू भाऊ हा नीरज बवाना, बमबिहा गँगसोबत काम करत होता. हिमांशू भाऊचं लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड गँगशी शत्रुत्व आहे. हिमांशू भाऊ हा मूळचा रोहतकच्या रिटोली गावचा रहिवासी आहे. त्याला गावात हिमांशू रिटोली नावाने ओळखतात. हिमांशू भाऊ बाल सुधारगृहातून फरार झालेला गुन्हेगार आहे. त्याच्यासोबत जवळपास 20 अल्पवयीन मुले देखील फरार झाली होती. पुढे हिमांशूने पोर्तुगालच्या दिशेने पळ काढला होता. त्यानंतर अमेरिकेत बसून गँग चालवत होता. यानंतर त्याच्याविरोधात 2023 साली लुकआऊट सर्कुलर जारी करण्यात आलं होतं.

कुख्यात गँगस्टर हा एनआयएसहित एसटीएफ, दिल्ली पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत देखील आहे. त्याच्या अनेक गुंडांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 17 वर्षांचा असताना त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रोहतक आणि झज्जरनंतर त्याचं गुन्हेगारीचं जाळ दिल्लीपर्यंत पोहोचलं.. रिटोली गावात 2019 साली दाखल गुन्ह्यातही हिमांशू भाऊचा समावेश होता. पुढे न्यू मॉडल टाऊन यूनियनचे प्रमुख संजय पुनिया यांच्याकडून पैसे उकळल्याबद्दलही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटक देखील झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर 2020 साली एका गोळीबार प्रकरणात अडकला होता.  याच प्रकरणात त्याने हिसारच्या तुरुंगातून पळ काढला होता. नंतर 2021 मध्ये त्याच्याविरोधात घरफोडी आणि गोळीबार प्रकरणातही कारवाई झाली. हंसराज हत्या प्रकरणाशी देखील त्याचं नाव जोडले गेले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles