Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

महाजनसागराच्या उपस्थितीत आमदार नितेश राणे यांनी भरला उमेदवारी अर्ज. ; हजारोंची गर्दी, ढोल ताशा, घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी.!

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे ते तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे ,त्यानिमित्त कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली आहे.या रॅलीने आम.नितेश राणे जावून थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. श्रीदेव गांगो मंदिरात देवतेला श्रीफळ देऊन रॅली ची सुरुवात करण्यात आली. भाजप नेते नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर, श्री निलेश राणे, सौ नीलमताई राणे सौ. नंदिता राणे, सौ प्रियांका राणे,  कुमार अभिराज राणे कुमार निमित राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, दत्ता सामंत यांच्या हजारो प्रमुख पदाधिकारी आणि जनसागराच्या उपस्थितीत ही रॅली रवाना झाली.

रॅलीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, आरपीआय माहायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.त्यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक , माजी आमदार अजित गोगटे,माजी आम. प्रमोद जठार,माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री व, माजी जि. प. उपाध्यक्ष आरीफ बगदादी,देवगड तालुकाध्यक्ष राजू शेटये, अमित साटम, दया पाटील,
वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, दिलीप रावराणे, प्राची तावडे, उषकला केळुसकर, प्रियंका साळसकर, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, जिल्हा चिटणीस अमोल तेली, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव आदी सहभागी झाले आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles