नवीमुंबईत दोन मुलींवर गोळीबार, एका हल्लेखोराला अटक, दुसरा फरार. ; नेमके काय घडले?

नवी मुंबई : नवी मुंबईतील सेक्टर एक येथे एका थरारक घटनेत दोन मुलींवर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एका मुलीच्या कानाजवळ तर दुसऱ्या मुलीच्या पाठीत गोळी घुसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोघी जणींवर नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, या प्रकरणात कोपरखैरणे पोलिसांनी एका २२ वर्षांच्या तरुणाला अटक केली असून त्याचा दुसरा साथीदार फरार झाला आहे. या गोळीबारामागचे कारण समजू शकलेले नसून पोलिस तपास करीत आहेत.

नवी मुंबई येथील सेक्टर १ मध्ये एका थरारक घटनेत दोन मुलींवर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका मुलीच्या कानाजवळून गोळी गेली आहे. तर तिच्या मैत्रिणीच्या पाठीत गोळी घुसल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या दोघींना तातडीने नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य हल्लेखोर अर्जुन चव्हाण (वय २२) याला तातडीने अटक केली. मात्र, त्याचा साथीदार राकेश चव्हाण हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कोपरखैरणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles