अंध बांधवांच्या आयुष्यात उजळला मायेचा दीप!, भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या दातृत्वातून दिवाळीचा आनंद द्विगुणित! ; नॅब संस्थेतील अंध बंधू-भगिनींना साड्या, टी-शर्ट व फराळाचे प्रेमपूर्वक वाटप!

सावंतवाडी : दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी नव्हे; तर समाजातील प्रत्येक घटकाच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पेरण्याचा, माणुसकीच्या नात्यांना प्रेमाचा सुगंध देण्याचा आणि उपेक्षितांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवण्याचा सण! याच दिवाळीच्या खऱ्या अर्थाला साजेसा माणुसकीचा दीप सावंतवाडीत प्रज्वलित झाला. महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या दातृत्वपूर्ण पुढाकारातून सावंतवाडी येथील नॅब (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) संस्थेतील अंध बंधू-भगिनींना टी-शर्ट, साड्या आणि दिवाळी फराळाचे प्रेमपूर्वक वाटप करण्यात आले.

दृष्टी नसली तरी मनात स्वप्नांची उजळणी करणाऱ्या आणि परिस्थितीशी जिद्दीने दोन हात करणाऱ्या या अंध बंधू-भगिनींच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद अधिक गोड करण्याचा हा संवेदनशील प्रयत्न ठरला. डोळ्यांना दिसणाऱ्या रोषणाईपेक्षा मनाला जाणवणाऱ्या आपुलकीचा प्रकाश अधिक मोलाचा असतो, याची जाणीव या उपक्रमाने करून दिली. भेटवस्तूंच्या रूपाने मिळालेला हा स्नेहाचा ठेवा आणि मायेची ऊब उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.

या प्रसंगी सिंधुदुर्ग नॅब संस्थेचे चेअरमन अनंतराव उचगांवकर, सेक्रेटरी आबा कशाळीकर, खजिनदार डॉ. विनया बाड, श्री. शेलटकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. वैभवी शेवडे, युवा नेते विशाल परब यांचे प्रतिनिधी केतन आजगांवकर, साईप्रसाद भोई, धिरेंद्र म्हापसेकर, तसेच स्नेहनागरी पतसंस्थेचे शिवकुमार उचगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेतील सुमारे ९० हून अधिक अंध बंधू-भगिनींची उपस्थिती लाभली.

दरम्यान, विशाल परब यांच्या माध्यमातून अंध बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू आणि वंचित घटकांच्या आनंदात सहभागी होण्याची ही भावना निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी विशाल परब यांचे आभार मानले.

खऱ्या अर्थाने दिवाळी तेव्हाच उजळते, जेव्हा आपल्या आनंदातील एखादा क्षण आपण दुसऱ्याच्या आयुष्यातही फुलवतो!

विशाल परब यांच्या या दातृत्वातून केवळ वस्तूंचे वाटप झाले नाही, तर माणुसकीचा सुगंध, आपुलकीचा स्पर्श आणि सामाजिक संवेदनशीलतेचा प्रकाश अनेकांच्या मनात दरवळला. दिवाळीच्या मंगलपर्वात माणुसकीचे नाते अधिक घट्ट करणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles