धनादेश अनादर प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी विशेष लोकअदालत.

धनादेश अनादर प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी विशेष लोकअदाल
सिंधुदुर्ग, दि. १६ (जिमाका) : निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, १८८१ मधील कलम १३८ अंतर्गत धनादेश अनादर (Cheque Bounce) संदर्भातील प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने व जलद निपटारा करण्यासाठी शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही विशेष लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.
व्यावसायिक व्यवहार, कर्ज व्यवहार तसेच अन्य आर्थिक देवाणघेवाणीतून उद्भवणाऱ्या धनादेश अनादराच्या अनेक प्रकरणांचा न्यायालयांमध्ये निपटारा होणे बाकी आहे. अशा प्रकरणांमध्ये परस्पर संमतीने तडजोड होण्यास वाव असल्याने लोकअदालत हे प्रभावी व्यासपीठ ठरते. या माध्यमातून दोन्ही पक्षकारांच्या संमतीने वादावर तोडगा काढता येतो. त्यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होऊन दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियेपासून दिलासा मिळतो.
धनादेश अनादर प्रकरणांमध्ये परस्पर संवाद व समन्वयातून समाधानकारक तोडगा काढण्याची संधी या विशेष लोकअदालतीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणांतील पक्षकारांनी शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांनी केले आहे.
00000

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles