बँकॉकमध्ये रंगणार ‘वर्ल्ड हेरिटेज पेजंट’, भारताचे तीन स्पर्धक सज्ज!  ; गायत्री भांबारे, यश पोतदार आणि डॉ. सपना साहू करणार भारताचे प्रतिनिधित्व.

पुणे : थायलंडमधील बँकॉक येथे २० नोव्हेंबर २०२६ पासून आयोजित ‘वर्ल्ड हेरिटेज पेजंट’ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत पुण्याच्या मृणाल एन्टरटेन्मेंटचे तीन स्पर्धक भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. नाशिकची गायत्री भांबारे, ठाण्याचा यश पोतदार आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील डॉ. सपना साहू यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.

या स्पर्धेत गायत्री भांबारे ‘मिस हेरिटेज इंडिया’, यश पोतदार ‘मिस्टर हेरिटेज इंडिया’, तर डॉ. सपना साहू ‘हेरिटेज गोल्ड इंडिया’ या किताबांसह सहभागी होणार आहेत. भारताचा समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पारंपरिक वारसा जागतिक व्यासपीठावर सादर करण्याची संधी या तिन्ही स्पर्धकांना मिळणार आहे.

हेरिटेज पेजंट इंडियाचे नॅशनल डायरेक्टर मृणाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिनाभरापासून तिन्ही स्पर्धकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात व्यक्तिमत्त्व विकासासोबत भारतीय संस्कृती, ऐतिहासिक परंपरा आणि देशाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख प्रभावीपणे मांडण्यावर भर देण्यात येत आहे. बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची सर्वांगीण तयारी सुरू आहे.

विविधतेने नटलेल्या भारतीय वारशाची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे हा या सहभागामागील प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. तिन्ही स्पर्धकांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद करत मृणाल एन्टरटेन्मेंटने त्यांचे अभिनंदन केले आणि स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles