अणसूर ग्रामपंचायतीच्या जिल्हास्तरीय यशाबद्दल भाजपच्या वतीने सत्कार! ;  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्ह्यात अव्वल, सरपंच सत्यविजय गावडे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचा गौरव!

वेंगुर्ला:  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अणसूर ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, कर्मचारी आणि सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कारप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, भाजप वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष पपू परब, वेंगुर्ला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर उपस्थित होते. तसेच मातोंडच्या सरपंच मयुरी वडाचेपाटकर, पालच्या सरपंच कावेरी गावडे आणि तुळसच्या सरपंच रश्मी परब , श्रीकांत रानडे , मारुती दोडानशट्टी यांचीही उपस्थिती होती.

यावेळी अणसूरचे सरपंच सत्यविजय गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, ग्रामपंचायत सदस्य वामन गावडे, सुधाकर गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे व संयमी गावडे, डिजिटल मित्र तन्वी गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी सोनू गावडे, आशासेविका अनुष्का तेंडोलकर, अंगणवाडी सेविका अनिषा गावडे, अंगणवाडी मदतनीस अन्नपूर्णा गावडे तसेच ग्रामस्थ प्रभाकर गावडे व गणेश गावडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविणे ही संपूर्ण अणसूर गावासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. ग्रामपंचायतीचे यश हे केवळ एका व्यक्तीचे किंवा पदाधिकाऱ्यांचे नसून त्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, विविध शासकीय योजनांशी संबंधित घटक आणि ग्रामस्थ या सर्वांचे योगदान महत्त्वाचे असते. अणसूर ग्रामपंचायतीने लोकसहभाग आणि प्रशासकीय समन्वयातून हे यश संपादन केले आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून अणसूर ग्रामपंचायतीची ही कामगिरी इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच सत्यविजय गावडे यांनी या यशाचे श्रेय लोकसहभाग, लोकप्रतिनिधींचे योगदान आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याला दिले. ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये सर्वांचे सहकार्य लाभल्यानेच हे यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अणसूर ग्रामपंचायतीने मिळविलेल्या या जिल्हास्तरीय यशाबद्दल भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारातून ग्रामपंचायतीच्या सामूहिक प्रयत्नांचा आणि योगदानाचा गौरव करण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles