‘सक्षम’ लघुपटाची उपमुख्यमंत्री शिंदे फिल्म फेस्टिवलमध्ये अधिकृत निवड. ; इंद्रायणी ग्रुप सावंतवाडीची प्रस्तुती.

सावंतवाडी ; इंद्रायणी प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्माती आदिती अविनाश म्हापणकर व अविनाश म्हापणकर यांच्या लेखन, दिग्दर्शन व निर्मितीखाली साकारलेल्या ‘सक्षम’ या लघुपटाची अखिल भारतीय शिवप्रहार राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव २०२६ अंतर्गत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फिल्म फेस्टिवलमध्ये अधिकृत निवड झाली आहे.
२ ऑगस्ट रोजी आ. बच्चू कडू व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत या लघुपट स्पर्धेची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग मंत्रालय, आरोग्य योजना, सत्ता परिवर्तन आणि मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामान्य माणसापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास – या सहा प्रमुख विषयांवर लघुपट बनवण्याचे आव्हान ठेवण्यात आले होते.या स्पर्धेसाठी देशभरातून १७० हून अधिक लघुपट प्राप्त झाले होते, त्यापैकी पात्र ठरलेल्या ९४ लघु चित्रपटांमध्ये ‘सक्षम’ या लघुपटाची निवड झाली आहे. या स्पर्धेचा अंतिम निकाल जानेवारीमध्ये उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे जाहीर होणार आहे.

‘सक्षम’या लघुपटामध्ये अविनाश म्हापणकर, लविना सिक्वेरा ,मुकुंद परब, अर्चना गावकर, किरण तोरसकर , रामचंद्र गावडे आणि ज्ञानेश्वर सावंत यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
बालकलाकार : वेदा वारंग, सुजेन शेख, आराध्य सावंत आणि अयांश सावंत यांनी आपल्या अभिनयातून योगदान दिले आहे.
सहकलाकार : प्रतिभा सावंत, मनाली राऊत, आयरीन दिशा, श्रेया नाईक, जयश्री बिर्जे आणि मिस्बा शेख यांनी भूमिका साकारल्या आहेत.
ड्रेस व मेकअप: अदिती अविनाश म्हापणकर.
तांत्रिक टीम
कॅमेरा मॅन: जयवंत मेस्त्री
एडिटर :साई मेस्त्री
ग्रामीण भागातील कलाकार, बालकलाकार आणि नवोदित कलावंतांना चित्रपट क्षेत्रात आपली कला सादर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ मिळणे ही अभिमानाची बाब आहे. ‘सक्षम’ या लघुपटाची अधिकृत निवड ही संपूर्ण टीमच्या मेहनतीची, कल्पकतेची आणि कलात्मक योगदानाची पावती मानली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles