अखेर विशाल परब यांचे भाजपातून निलंबन, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आदेश.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत यांनी अखेर विशाल परब यांच्यावर कारवाई केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची ४ नोव्हेंबर ही तारीख होती. पक्षात बंडखोरी झाल्याने, पक्ष विरोधी वागणूक झाल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसे पत्र श्री. सावंत यांनी विशाल परब यांना दिले आहे.

यावेळी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी पत्रातून दिले आहेत. महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधी काम करणाऱ्यावर योग्य ती कारवाई पक्ष करणार, अशीही यावेळी ताकीद दिली गेली आहे.

दरम्यान, प्रभाकर सावंत यांनी तशा आशयाच्या सूचना पत्राद्वारे कळवून त्यांना सूचित केले आहे. यावेळी विशाल परब यांच्यासोबत असणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles