रेडी येथे ‘एक दीप भारत मातेच्या वीर जवानांसाठी’ कार्यक्रमाचे आज आयोजन!

वेंगुर्ला : तालुक्यातील रेडी येथील स्वयंभू श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून कार्तिक अमावस्या ३० नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजल्यानंतर श्री सप्तेश्वर (स्वयंभू) महादेव मंदिर रेडी येथे १००१ दीप प्रज्वलित करून गावातील सामाजिक ऐक्य व बांधिलकी जपण्याची उद्दिष्ट ठेवून दीपोत्सव २०२४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत मातेच्या शहीद झालेल्या वीर जवानांकरीता आदरांजली म्हणून “एक दीप भारत मातेच्या वीर जवानांसाठी” दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे.

दीपोत्सवाचे यंदाचे आठवे वर्ष असून या कार्यक्रमात स्वयंभू श्री सप्तेश्वर महादेवाच्या मंदिरात सुवासिनी स्त्रियांकडून पूजन करून नंतर संपूर्ण मंदिराला दिव्यांनी सजवून आपल्या भारत मातेचे आरक्षणासाठी अविरत लढणाऱ्या व लढता लढता शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांसाठी दीपोत्सवाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सतर्क पोलीस टाइम्स, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ व कै राजन बापू रेडकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवा, अशी विनंती करण्यात येत आहे.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles